अकलूज – खंडाळी (ता. माळशिरस) येथे जय भवानी नवरात्रौत्सव मंडळाच्या वतीने श्रीपूर रोड येथील जय भवानी मंदिरासमोर ११११ दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन आज शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी सात वाजता करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष अमोल मेथा यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असेही आवाहन मेथा यांनी केले आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.