मुंबई – भारतीय संघाचा कर्णधार व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या दहा महिन्याच्या मुलीला रेप करण्याची अलिकडे धमकी देण्यात आली होती. टी-20 विश्वचषकातील भारत-पाक सामन्यामध्ये भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर ही धमकी देण्यात आली असून यावर अनुष्काने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेत्री अनुष्का प्रतिक्रिया देताना म्हणाली की, या प्रकरणानंतर माझे मन दु:खी झाले आहे. घडलेल्या या प्रकरणाबद्दल माझ्या मनात चिड निर्माण झाल्याचे अभिनेत्रीने सांगितले आहे.
दरम्यान, अभिनेत्री अनुष्का व कर्णधार विराट कोहलीच्या मुलीला सोशल मीडियावरून बलात्काराच्या धमक्या आल्यानंतर या प्रकरणाची दखल दिल्ली महिला आयोगाने सुद्धा घेतली आहे. महिला आयोगाने या संदर्भात पोलिसांना नोटीस पाठवली आहे.