Jayant Patil on Ajit Pawar। महाविकास आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार आणि माजी खासदार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ रायगडच्या मोर्बा येथे मविआची जाहीर सभा पार पडली. या सभेत शरद पवार यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीदेखील या सभेला संबोधित केले. यावेळी जयंत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) प्रमुख अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
तुम्ही त्या गद्दाराला खूप मोठं केलंत Jayant Patil on Ajit Pawar।
दरम्यान, रायगडच्या सभेत शेकापचे जयंत पाटील शरद पवारांकडे पाहून म्हणाले, तुम्ही त्या गद्दाराला खूप मोठं केलंत. त्याचं नको तेवढं पोट भरून दिलं आहे. परंतु, आजचं वर्तमानपत्र वाचल्यानंतर माझं मन चलबिचल झालं. अजित पवार बोलू लागले आहेत की, निवडणूक झाल्यावर एकत्र येण्याबाबत सांगतो. या निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. त्यानंतर ते तुमचे (शरद पवार) पाय धरायला येतील. मात्र तुम्ही त्यांना तुमचे पाय धरू देऊ नका. नाहीतर तुम्ही त्यांना पाय धरू द्याल आणि आम्हाला इथून बाहेर काढाल. त्यामुळे तुम्ही आम्हाला शब्द द्या.
मी माझी भूमिका स्वीकारलीय Jayant Patil on Ajit Pawar।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडले आहेत. मात्र सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर हे दोन्ही गट एकत्र येतील अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण होऊ द्या. तोवर मला या विषयावर काहीच बोलायचं नाही. कारण माझ्याकडे वेगळ्या प्रकारचा प्रचार चालला आहे. काही लोकांना बुचकाळ्यात टाकण्याकरता आमचे विरोधक वेगवेगळे दावे करत आहेत. हे लोक (आम्ही) पुढे एकत्रच येणार असल्याच्या बाता मारतायत. म्हणूनच मला माझ्या मतदारांना, कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की, मी माझी भूमिका स्वीकारली आहे तीच भूमिका कायम राहील.