मुंबई – ‘जवान’ पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये तुफान कमाई करत आहे. चित्रपटाची बंपर ऍडव्हान्स बुकिंग झाली होती आणि आता जवानच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे ट्रेंडही येऊ लागले आहेत, त्यानुसार शाहरुख खानच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. ‘जवान’ चित्रपटात प्रेक्षकांना साऊथचा तडका, बॉलिवूडचा मसाला बघायला मिळतो आहे.
जवान सर्व भाषांमध्ये रिलीज झाला असून, सिनेमाने जगभरात दमदार कलेक्शन केलं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जवानने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. सध्या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस जबरदस्त ठरत आहे. जिथे पहिल्या दिवशी चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 129 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी हा आकडा 235 ते 250 कोटींच्या पुढे गेला आहे.
तर आता तिसऱ्या दिवशी चित्रपटाचा आकडा भारतातच 200 कोटींचा आकडा पार करण्यासाठी सज्ज झाला आहे कारण चाहते वीकेंडच्या सुट्टीचा फायदा घेताना दिसतील. जवान हा चित्रपट तीन दिवसात भारतात किती कमाई करू शकतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर, जगभरात हा आकडा 300 कोटींचा आकडा पार करू शकतो असं देखील सांगण्यात आलं आहे.
जवानने पहिल्या दिवशी जगभरात 129 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर भारतात हा आकडा 74.5 कोटी रुपये होता. यामध्ये चित्रपटाने हिंदीमध्ये 65.5 कोटी रुपये, तमिळमध्ये 5.3 कोटी रुपये आणि तेलुगूमध्ये 3.7 कोटी रुपये कमावले आहेत.