नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉक डाऊनचा तिसरा टप्पा येत्या ४ मेपासून लागू करण्यात येत आहे. असं असलं तरी लॉक डाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधांमध्ये सरकारतर्फे काहीशी शिथिलता देण्यात येत आहे.
Opening liquor shops during the lock down will only bring disastrous results . In any case according to all the surveys nowadays domestic Violence has increased to a large extent .liquor will make these days even more dangerous of for women and children .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) May 2, 2020
दरम्यान, वृत्तसंस्थेमार्फत मिळालेल्या माहितीनुसार मद्य विक्री केवळ ग्रीन झोनमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली असली तरी काही वृत्तवाहिन्यांनी संपूर्ण देशभरामध्ये मद्य विक्रीस परवानगी दिली जाईल असा अंदाज वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर संगीतकार जावेद अख्तर यांनी ट्विट केले आहे. सध्या सोशल माध्यमांमध्ये या ट्विटला चांगलाच प्रतिसाद मिळत असून काही युजर्सने त्यांना ट्रोल केले आहे.
जावेद अख्तर यांनी आहे की,’लॉकडाउन दरम्यान मद्य विक्री फार घातक ठरू शकते, आता पर्यंत झालेल्या सर्व सर्वेक्षणात मद्य हे हिसेंसाठी कारणीभूत ठरले आहे. यातच मद्य विक्रीमूळे लॉकडाउन दरम्यान जास्त प्रमाणात हिंसेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढवेल.’ असं ही त्यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या ट्विटला युजर्सद्वारे मद्य विक्री बाबत चांगल्याच प्रतिक्रिया दिसून आल्या आहे.