मुंबई – भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावर आता न्यूझीलंडमध्ये उपचार केले जाणार आहेत. यानंतर त्याला किमान पाच महिने क्रिकेटपासून लांब राहावे लागणार आहे.
त्यामुळे त्याला यंदाच्या आयपीएल स्पर्धेसह जून महिन्यात इंग्लंडमध्ये होत असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यालाही मुकावे लागणार आहे.
#INDvAUS 3rd Test Day 2 : भारतीय संघावर पराभवाचं सावट; ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या…
त्याला पाठीच्या दुखापतीने गेले काही महिने त्रस्त केले असून, अत्याधुनिक उपचारांसाठी न्यूझीलंडला पाठवले जाणार आहे. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर झालेल्या दुखापतीमुळे त्याला आशिया करंडक तसेच टी-20 विश्वकरंडक स्पर्धांमध्ये खेळता आले नव्हते. बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यासाठीच तो या आठवड्यात न्यूझीलंडला रवाना होणार आहे.