पुणे – आशियाई बुद्धिबळ महासंघाच्या वतीने भारतीय महिला बुद्धिबळ संघाच्या प्रशिक्षणात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल ग्रॅंडमास्टर अभिजित कुंटे यांना वुमेन्स कोच ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई बुद्धिबळ परिषदेअंतर्गत 5 व्या वार्षिक आशियाई बुद्धिबळ उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्यात सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आशियाई बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष शेख सुलतान बिन खलिफा अल नाहयान यांच्या हस्ते यावेळी ध्यानचंद पुरस्कार विजेते ग्रॅंडमास्टर अभिजित कुंटे यांनी पुरस्कार स्वीकारला.
#IraniCup #MPvROI 2nd Day : शेष भारताची सामन्यावर पकड; मध्यप्रदेश दिवसअखेर 3 बाद 112
कुंटे यांच्या प्रशिक्षणाच्या जोरावर भारतीय महिला संघाने चेन्नई येथे झालेल्या 44 व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 मध्ये पहिल्यांदाच ब्रॉंझपदकाची कमाई केली होती. ग्रॅंडमास्टर अभिजित कुंटे हे इंडियन ऑईलमध्ये कार्यरत आहेत.