मागील काही दिवसापासून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत असंख्य बातम्या सुरु होत्या. बीसीसीआयने बुमराह टी-२० विश्वचषक खेळणार की नाही याबाबत मोठा सस्पेन्स ठेवला होता. मात्र आता याबाबत बीसीसीआयने अधिकृत माहिती दिली आहे. बुमराह टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये खेळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे तो या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाच्या गोलंदाजीची जबाबदारी कोण सांभाळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वी पीटीआय या वृत्तसंस्थेने एक वृत्त दिले होते. त्यामध्ये त्यांनी बुमराह टी-२० विश्वचषक खेळणार नाही असे सांगितले होते. त्यानंतर बीसीसीआयने याबाबतीत सस्पेन्स ठेवत बुमराह अजून बाहेर पडलेला नाही, आम्ही त्याबाबत विचार आहोत, असे म्हटले होते. मात्र आता बीसीसीआयने स्पष्ट सांगितले आहे की, जसप्रीत बुमराह आगामी टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा भाग नसणार आहे.
बुमराह मागील बऱ्याच काळापासून पाठीच्या दुखापतीने संघाबाहेर होता. आशिया चषक स्पर्धेतही त्याला खेळवण्यात आले नव्हते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया विरुध्द्व काही सामन्यांमध्ये तो खेळाला नव्हता. बुमराहच्या जागी कोणत्या गोलंदाजाला संघात स्थान दिले जाणार याबाबत बीसीसीआयने आजून कोणतीही माहिती दिलेली नाही. बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला विश्वचषक संघात सहभागी केलं जाण्याची दाट शक्यता आहे.
टी-२० वर्ल्डपकमधील भारतीय संघाचे वेळापत्रक
भारत विरुद्ध पाकिस्तान, २३ ऑक्टोबर- मेलबर्न
भारत विरुद्ध पात्रता फेरीतील संघ, २७ ऑक्टोबर, सिडनी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ३० ऑक्टोबर, पर्थ
भारत विरुद्ध बांगलादेश, २ नोव्हेंबर, एडिलेड ओव्हल.