Jasprit Bumrah : पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक २०२२ सुरु होणार आहे. त्यापूर्वीच टिम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. टिम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. बीसीसीआयच्या ( BCCI ) सूत्रांकडून हि माहिती समोर आली आहे.
आशिया चषक स्पर्धेत बुमराहला ( Jasprit Bumrah ) त्याच्या दुखापतीमुळे खेळवण्यात आले नव्हते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुध्दही तो सर्व सामने खेळला नव्हता. त्याचबरोबर कालपासून सुरु झालेल्या साऊथ आफ्रिका विरुद्धच्या मालिकेतील पाहिल्या सामन्यात तो खेळाला नाही. संघात त्याचे सातत्याने न खेळणे आणि आता तर थेट विश्वचषक सारख्या मोठ्या स्पर्धेतून त्याला बाहेर पडावे लागले आहे.
बुमराहचे ( Jasprit Bumrah ) विश्वचषकात न खेळणे भारतीय संघासाठी खूप मोठी धोक्याची घंटा मनाली जात आहे. कारण आशिया चषक पासून बुमराहच्या गैरहजेरीत भारतीय संघाच्या गोलंदाजांची अत्यंत सुमार अशी कामगिरी राहिली आहे. बुमराह व्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार सोडला तर इतर कोणत्याही गोलंदाजाला जास्त अनुभव नाही. त्यातच मागील काही सामन्यात भुवनेश्वर कुमारची गोलंदाजी अत्यंत खराब अशीच राहिली आहे. त्यामुळे आता बुमराहची कमतरता कोण भरणार असा प्रश्न भारतासमोर उभा राहिला आहे.
अगोदर भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला होता. त्यानंतर आता बुमराह देखील पाठीच्या दुखापतीमुळे खेळणार नसल्याचे समजल्यानंतर भारतीय संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. ( Jasprit Bumrah out of T20 World Cup 2022 due to back injury )
या दोन महत्वाच्या खेळाडूंची कमतरता भरून काढणे भारतीय संघाला जरा कठीणच जाणार आहे. आशिया चषक स्पर्धेत बुमराहची कमी संघाला चांगलीच भासली होती. मात्र आता तो टी-२० विश्वचषकात खेळणार नसल्यामुळे कर्णधार रोहित शर्मासह प्रशिक्षक राहुल द्रविड यांची डोकेदुखी वाढणार आहे.
टी-२० वर्ल्डपकमधील भारतीय संघाचे वेळापत्रक
भारत विरुद्ध पाकिस्तान, २३ ऑक्टोबर- मेलबर्न
भारत विरुद्ध पात्रता फेरीतील संघ, २७ ऑक्टोबर, सिडनी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ३० ऑक्टोबर, पर्थ
भारत विरुद्ध बांगलादेश, २ नोव्हेंबर, एडिलेड ओव्हल.