Shikhar Dhawan Emotional Note Son Zoravar Birthday : भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन त्याचा मुलगा ‘जोरावर’ याच्या वाढदिवसानिमित्त भावूक झाला. गेल्या एक वर्षापासून आपल्या मुलाला न भेटलेल्या धवनने आपल्या मुलासाठी एक अतिशय भावनिक चिठ्ठी लिहिली आहे.
धवनने आपल्या चिठ्ठीत सांगितले की, गेल्या तीन महिन्यांपासून त्याला सर्वत्र ब्लॉक करण्यात आले आहे, त्यामुळे तो त्याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या मुलाचा जुनाच फोटो शेअर करत आहे.
काही काळापूर्वी शिखर धवन आणि त्याची माजी पत्नी आयशा घटस्फोटाद्वारे वेगळे झाले होते. विशेषतः शिखर धवनच्या घटस्फोटानंतर एक वडील म्हणून त्याचा जो संघर्ष सुरु आहे तो अनेकांना भावुक करून जाणारा आहे. तेव्हापासून धवन आपल्या मुलाला भेटू शकलेला नाही.
आपल्या मुलासाठी लिहिलेल्या चिठ्ठीत धवनने सांगितले की, तो 1 वर्षापासून जोरावरला भेटलेला नाही. याशिवाय तीन महिन्यांपासून त्यांनी आपल्या मुलाला कोणत्याही प्रकारे पाहिले नाही.
आपल्या मुलाला झोरावरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना धवनने त्याच्या नोटमध्ये लिहिले की, “मी तुला भेटून एक वर्ष झाले आहे आणि आता जवळपास तीन महिने झाले आहेत, मला सर्वत्र ब्लॉक करण्यात आले आहे, म्हणून तुला शुभेच्छा देण्यासाठी मी जुनाच फोटो शेअर करत आहे. माझ्या मुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
या चिठ्ठीत त्याने पुढे लिहिले आहे की, “मी तुम्हाला थेट भेटू शकलो नसलो तरी, मी तुमच्याशी टेलिपॅथीद्वारे संपर्क साधला आहे. मला तुझा अभिमान आहे. मला माहित आहे की तू बरा आहेस आणि चांगला मोठा होत आहेस.”
भारतीय फलंदाजाने पुढे लिहिले की, “तुझा बाबा नेहमी तुझी आठवण काढतात आणि तुझ्यावर प्रेम करतो. तो नेहमी सकारात्मक असतो आणि देवाच्या कृपेने आपण पुन्हा कधी भेटू या वेळेची वाट पाहत असतो. तू खोडकर हो, पण विध्वंसक नाही. दानशूर, नम्र, दयाळू आणि बलवान हो.”
View this post on Instagram
धवनने पुढे आपले मत व्यक्त केले आणि लिहिले आहे की,”मी तुझ्यापर्यंत पोहोचत नसलो तरी मी तुला रोज मेसेज करत असतो. तुझ्या दैनंदिन जीवनाबद्दल विचारतो आणि मी काय करत आहे आणि माझ्या आयुष्यात नवीन काय आहे हे सांगत असतो.”
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन सध्या संघाबाहेर आहे. क्रिकेटपासून दूर असला तरी धवनचे आयुष्य अडचणींनी भरलेले दिसते. मात्र, आयपीएलमध्ये तो पंजाब किंग्जचा कर्णधार असून पुढील हंगामात तो खेळताना दिसणार आहे. अलीकडच्या काळात धवनला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.