जपानचे टोकियो जगात सर्वात सुरक्षित शहर

राजधानी दिल्लीचा 53 वा क्रमांक

नवी दिल्ली : जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. या यादीत जपानच्या टोकियो शहराने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर या यादीत देशाची राजधानी दिल्लीला चक्‍क 53 वा क्रमांक मिळाला आहे. इकॉनॉमिक्‍स या साप्ताहिकाच्या चमूने याचे सर्वेक्षण केले असून सर्वेक्षणात बऱ्याच शहरांना आपला या अगोदरचा क्रमांक गमवावा लागला आहे. यात हॉंगकॉंग शहराची 20 क्रमांकावर घसरण झाल्याचे पहायला मिळाले. तर वॉशिंग्टन शहराने आपली सुरक्षेची पातळी वाढवून 10 व्या क्रमांकावर मजल मारली आहे.

जगातील पाच खंडातील 60 शहरांचा या यादीत समोवश करण्यात आला आहे. या सर्वेक्षणासाठी शहरातील डिजीटल आणि अत्याधुनिक सुविधा, आत्पकालिन यंत्रणा आणि वैयक्‍तिक सुरक्षा यांचा विचार करण्यात आला होता. 2017 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात हॉंगकॉंगचे स्थान 9 व्या क्रमांकावर होते परंतू, मागील तीन वर्षापासून हॉंगकॉंगचा सुरक्षास्तर ढासळत जात असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. पाकिस्तानमधील कराचीने या यादीत 57 वे क्रमांक पटाकवले आहे. तर दिल्ली 53 व्या क्रमांकावर आहे दिल्लीच्या मानाने कराची एवढे सुरक्षित शहर नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर बांग्लादेशची राजधानी ढाका या शहराला 56 वा क्रमांक मिळाला आहे. दरम्यान, आशिया आणि पॅसिफिक खंडात म्हणाव्या तितक्‍या डिजीटल सुविधा अजूनही नसल्याचे इकॉनॉमिक्‍स साप्ताहिकाच्या चमूने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.