पर्युषण पर्वानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

पिंपरी – निगडी-प्राधिकरणच्या आकुर्डी येथील स्थानक भवनात चातुर्मास व पर्युषण पर्व आनंद श्रमणी रत्ना उपप्रवर्तिनी पु. कंचनकंवरजी म. सा. आदी ठाणा 7 च्या सानिध्यात मोठ्या उत्सवात साजरा होत आहे. संवत्सरी पर्व शुद्ध रूपाने अष्टदिवसीय आध्यात्मिक पर्व आहे. जैनांमध्ये हे आत्म-चिंतन, आत्म-निरीक्षण, आत्म-मंथन, आत्म शोधनाचे पर्व आहे.

याच काळात वर्धमान जैन श्रावक संघ आकुर्डी-निगडी-प्राधिकरणच्या आकुर्डी जैन स्थानकात ललिता जितेंद्र फिरोदीया या दिघी येथील 41 वर्षीय जैन भगिनीने 31 दिवसाचे निरंकार उपवासाचे (मासखमण) प्रत्याख्यान घेतले. पर्युषण पर्वामध्ये अष्ट दिवसीय 24 तासांचा अखंड नवकार महामंत्राचा जप सप्ताह निरंतर सुरू आहे.

श्री संघाने सांगली जिल्हयातील शिरटे गावातील जि.प्र.शाळेतील 427 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. कार्यक्रम यशस्वीतेसोठी अध्यक्ष संतोष कर्नावट, उपाध्यक्ष सुभाष ललवाणी, राजेंद्र खिवंसरा, धनराज छाजेड, सचिव प्रकाश मुनोत, शाम बोरा, मदन कांकरिया, राजेंद्र रातडिया, राजेंद्र छाजेड, जवाहर मुथा, रमण बाफणा, विजय ओस्तवाल, पोपटलाल कर्नावट, सुर्यकांत मुथीयान, मोतीलाल चोरडिया, नेनेसुख मांडोत, राहुल पारख, सचिन गांधी, अशोक नहार आदी विश्‍वस्तांनी चंदनबाला महिला मंडळ, सुशील बहुमंडळ, ब्राम्ही मंडळ, गुरुआनंद प्रार्थना मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.