सध्या लॉकडाऊन असल्याने सामान्य नागरिकांबरोबरच सेलिब्रिटी देखील घरबसल्या कोणत्या ना कोणत्या उपक्रमात बिझी राहण्याचा प्रयत्न करत आहेत. यात श्रीदेवी कन्या जान्हवी कपूरही मागे नाही. तिने अलीकडेच एका मासिकाच्या मुखपृष्टासाठी सिल्क पायजमा घालून फोटो शूट केले. याबरोबर तिने नो मेकअप लूक दिला आहे. ती या फोटोत खरोखरच नॅचरल ग्लोला फ्लॉन्ट करताना दिसते.
अर्थात जान्हवी कपूर ही नव्या पिढीतील लोकप्रिय नायिका मानली जाते. त्याचबरोबर ती फॅशन आणि स्टायलिंगसाठीही प्रसिद्ध आहे. यादरम्यान तिने हार्पर बाजार इंडियाच्या पहिल्या डिजिटल कव्हरसाठी फोटोशूट केला. या फोटोतील तिचा लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे. देशभरात सध्या लॉकडाऊन असल्याने सर्वजण घरात आहेत.
ही बाब लक्षात घेता मासिकाच्या मुखपृष्टासाठी जान्हवी कपूरने घरातच शूटिंग केले. अर्थात हा फोटो एखाद्या प्रोफेशनल फोटोग्राफरने नाही तर तिची बहीण खुशीने क्लिक केला आहे. हार्पर बाजारच्या डिजिटल कव्हरसाठी शूट करणाऱ्या चार नायिकांपैकी जान्हवीचा देखील समावेश आहे. सध्या ती घरातूनच काम करत आहे.
या कारणामुळे घरातील नेहमीच्या पोशाखात म्हणजेच पायजमा घालून मासिकासाठी फोटो काढले. यातील काही फोटोमध्ये तिचा डॉग पांडा देखील दिसतो. एवढेच नाही तर ती एका व्हिडिओमध्ये आपल्या डॉगला म्हणते, प्लीज माझ्या कॅमेरासाठी पोझ दे, म्हणजे तू क्यूट दिसशील. हा फोटो देखील बऱ्याचप्रमाणात क्यूट दिसत आहे. जान्हवी कपूरने सिल्क पायजमा घातलेला असताना मेकअप करण्याचेही टाळले आहे.