मुंबई – अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ‘मिली’ चित्रपटाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला असून, या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे देखील प्रेक्षकांनी चांगलंच कौतुक केलं होत. या चित्रपटाची कथा मिली नौडियाल नावाच्या मुलीच्या कथेवर आधारित आहे. मिली हा जान्हवी कपूरचा पहिला चित्रपट आहे, ज्यामध्ये तिने तिचे वडील बोनी कपूर यांच्यासोबत काम केले होते.
दरम्यान, आता अभिनेत्रीचा हाच बहुचर्चित चित्रपट ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. जान्हवी कपूरचा ‘मिली’ आजपासून म्हणजेच 30 डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होत आहे. खरं तर, याबद्दल माहिती देताना नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये जान्हवी लोकांना याबद्दल माहिती देताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये, अभिनेत्री थरथर कापते आणि ब्लँकेटने स्वतःला झाकते, परंतु तरीही ती थरथरत राहते. यानंतर, तिला कोणीतरी विचारले की, जान्हवीने एसी बंद करू का….. यावर अभिनेत्री म्हणाली नाही, मी फक्त माझा ‘मिली’ चित्रपट पाहण्याची तयारी करत आहे, जो आजपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होत आहे”. असं अभिनेत्री या व्हिडिओमध्ये म्हणते.
दरम्यान, या चित्रपटात जान्हवी कपूरसोबत अभिनेता सनी कौशलही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. जान्हवी कपूर आणि सनी कौशल पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर दिसले आहेत. मिली हा मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. साऊथमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे नाव ‘हेलन’ होते, जे लोकांना खूप आवडले होते. हा चित्रपट सस्पेन्सने भरलेला आहे.