मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतेच एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. बोनी कपूर आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवल्यापासून ती सतत आपल्या स्टाईलने चाहत्यांना वेड लावताना दिसत आहे. अलीकडेच अभिनेत्रीने बीच वेअरमधील काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
जान्हवी कपूरने एका मासिकाच्या कव्हरशूटसाठी हे फोटोशूट केले आहे. दरम्यान तिने केलेल्या या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर आग लागली आहे. ताज्या फोटोमध्ये जान्हवी कपूर हॉल्टर नेक क्रॉप टॉप घातलेली दिसत आहे. जो रस्ट गोल्ड कलरचा आहे. अभिनेत्रीने हा क्रॉप टॉप रस्ट गोल्ड कलरच्या उंच कंबर स्कर्टसह कॅरी केला आहे. अभिनेत्री हिरव्या पाण्याच्या मधोमध उभी राहून एकापेक्षा एक सिझलिंग पोज देताना दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने लांब सोनेरी कानातली रिंग घातली आहे. जान्हवीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सा वर्षाव केला आहे.