Janhvi Kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूरने ‘धडक’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिने दक्षिणात्य चित्रपटामध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. जान्हवी कपूर लवकरच ज्युनियर एनटीआरसोबत त्याचा आगामी चित्रपट ‘देवरा पार्ट 1’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी 10 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटानंतर जान्हवीने दुसऱ्या साऊथ सुपरस्टारसोबत तिचा दुसरा तेलगू चित्रपट साइन केला आहे. जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर यांनी आपल्या मुलीबद्दल तेलुगू इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार्ससोबत काम करण्याबद्दल सांगितले. ‘माझ्या मुलीने यापूर्वी ज्युनियर एनटीआरसोबत एक चित्रपट शूट केला आहे. येथे सेटवर घालवलेला प्रत्येक दिवस तिला खूप आवडतो. लवकरच ती राम चरणसोबत एक चित्रपट सुरू करणार आहे. हे दोन्ही सुपरस्टार खूप चांगले काम करत आहेत,” असे बोनी कपूर यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, ‘जान्हवी तेलुगू चित्रपट खूप पाहते. आशा आहे की चित्रपट चालतील आणि तिला आणखी काम मिळेल. ती लवकरच सूर्यासोबतही अभिनय करणार आहे. माझ्या पत्नीने अनेक भाषांमध्ये अभिनय केला आहे, मला आशा आहे की माझी मुलगी देखील असेच करेल.” जान्हवी कपूर राम चरणसोबत पुढील चित्रपट करणार असल्याची पुष्टी बोनी कपूर यांनी केली आहे. राम चरण स्टारर या चित्रपटाचे दिग्दर्शन बुची बाबू सना करणार आहेत. मात्र, या चित्रपटाचे शीर्षक अद्याप समोर आलेले नाही.
अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची ‘बावल’ चित्रपटात दिसली होती. आता जान्हवी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ आणि ‘उलझ’मध्ये दिसणार आहे. चाहते देखील तिचा आगामी सिनेमा पाहण्यास उत्सुक आहेत.