Devara : दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा ‘देवरा’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. ज्युनियर एनटीआरच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
‘आरआरआर’ सुपरहिट झाल्यानंतर ज्युनियर एनटीआरचा ‘देवरा’ देखील बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करण्यास सज्ज होणार आहे. एनटीआरने नवीन पोस्टर शेअर करत चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. मागील काही दिवसांपासून या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता देवरा हा चित्रपट यावर्षी 10 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. काही तांत्रिक गोष्टींमुळे आणि चित्रपटातील त्रुटी भरुन काढण्यासाठी वेळ लागणार असल्याने सिनेमाची डेट पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
View this post on Instagram
‘देवरा’ हा सिनेमा यापूर्वी 5 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार होता. अशातच आता निर्मात्यांनी या सिनेमाच्या रिलीज डेटमध्ये बदल केला आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट बदली असल्याची घोषणा केली आहे. ‘देवरा’ हा सिनेमा आता 10 एप्रिल 2024 रोजी रिलीज होणार आहे. ज्युनियर एनटीआरच्या या आगामी सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शन ड्रामा पाहायला मिळणार आहे.
कोरताला शिवा दिग्दर्शित देवरा सिनेमाची 300 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती केली आहे. या सिनेमाचा पहिला भाग 10 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. तेलुगू, तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. देवरा या मुळ तेलुगूमध्ये बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान डेब्यू करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
यात सैफ ‘भैरा’च्या भूमिकेत दिसणार आहे. तर जान्हवी कपूर या चित्रपटामध्ये थंगम नावाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय ज्युनिअर एनटीआर ‘वॉर 2’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमात तो हृतिक रोशनसोबत झळकणार आहे.