जयपुर: राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारने राज्यात जनता क्लिनीक योजना सुरू केली असून पहिल्या टप्प्यात गरीबांच्या वस्त्यांमध्ये एकूण बारा क्लिनिक सुरू करण्यात येत आहेत. त्यातील पहिल्या क्लिनिकचे आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. गरीबांना मोफत प्राथमिक उपचार व औषधे त्यात दिली जाणार आहे. तसेच नागरीकांची मोफत आरोग्य तपासणीही तिथे केली जाणार आहे.
राज्यातील सर्वसामान्यांना मोफत औषोधपचार आणि आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली असून त्याचे सुतोवाच राज्याच्या अंदाजपत्रकात करण्यात आले होते. निरोगी राजस्थान या माहीमे अंतर्गत ही जनता क्लिनीक राज्याच्या विविध भागात सुरू केली जाणार आहेत. त्याचा सामान्य नागरीकांना मोठा लाभ होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.