जम्मू काश्मीर – शोपीया जिल्ह्यात २ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर – जम्मू काश्मीर मधील शोपीया जिल्ह्यात सुरक्षा दले आणि दहशतवादी यांच्या मध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षादलांना यश मिळाले आहे. सुरक्षा दलांना मिळालेल्या माहितीनुसार शोध मोहीम हाती घेण्यात आली होती.

त्यानंतर शोपीया जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार करण्यास सुरवात केली. या गोळीबाराला प्रत्युत्तर देत सुरक्षादलानी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या संपूर्ण भागाला भारतीय सुरक्षादलांनी घेराव घातला असून सर्च ऑपरेशन अद्याप सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.