विमानांच्या कमतरतेमुळे विमान प्रवास महागला

तीन महिने परिस्थिती सुधारणार नाही

नवी दिल्ली -अनेक विमान कंपन्यांची विमाने विविध कारणांमुळे वापरात नसल्यामुळे पुरवठा कमी आणि मागणी जास्त झाली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यात विमान प्रवास महाग झाला आहे.

त्याचबरोबर आगामी काही महिने तरी परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्‍यता नसल्याचे विश्‍लेषण करणाऱ्या फिट्‌च संस्थेने म्हटले आहे. जेट एअरवेज कंपनीची जवळजवळ शंभर विमाने खेळत्या भांडवलाच्या अभावामुळे सेवेत नाहीत. त्याचबरोबर बोईंग 737 मॅक्‍स या विमानाचे दोन अपघात झाल्यानंतर ही विमाने वापरणाऱ्या भारतातील कंपन्यांनी ही विमाने वापरणे थांबवले आहे.

इंडिगो कंपनीची बरीच विमाने इंजिनातील बिघाडाच्या शक्‍यतेमुळे वापरात नाहीत. या कारणामुळे भारतातील विमान प्रवासाचे भाडे वाढत असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. कमीत कमी तीन महिने तरी या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्‍यता कमी आहे असे या संस्थेला वाटते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.