जामखेड : माजी मंत्री सुरेश धस यांना अटक केल्याच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन

जामखेड( प्रतिनिधी) : लोककल्याणासाठी व ऊसतोडणी मंजुरांसाठी संवैधानिक मार्गाने अहोरात्र झटणारे लोकनेते माजी महसूल मंत्री सुरेश धस यांना अटक केल्याच्या निषेधार्थ जामखेड येथिल सुरेश धस मित्रमंडळाच्या वतीने जामखेड येथिल खर्डा चौकात टायर जाळून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सुरेश आण्णा जिंदाबाद राज्य सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत परिसर दुमदुमून गेला होता.

लोक कल्याणासाठी आणि ऊसतोड मजुरांसाठी संवैधानिक मार्गाने आणि शांततेने आंदोलन करणारे सुरेश धस यांना आज दुपारी आष्टी पोलिसांनी अटक केल्याची बातमी वार्यासारखी सगळीकडे गेली व अटकेच्या निषेधार्थ जामखेड शहरातील खर्डा चौकात सुरेश धस मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन करत टायर पेटवून राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला.

यावेळी गणेश डोंगरे, शरद कार्ले, सुनिल जगताप, मनसेचे सनी सदाफुले, अभिजित राळेभात, सूरज पवार, गोरख धनवट, भरत राळेभात सह सुरेश अण्णा धस मित्र मंडळाचे जामखेड तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.