jalpaiguri accident | पश्‍चिम बंगालमध्ये वऱ्हाडाच्या वाहनांना अपघात; चौदा ठार

जलपैगुडी ( jalpaiguri accident ) – पश्‍चिम बंगालमध्ये जलपैगुडी जिल्ह्यात वऱ्हाडाला घेऊन वाहनांना झालेल्या अपघातात चौदा जण ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाणाऱ्या तीन मोटार कार दगडाची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकला धडकून हा अपघात झाला.

या कार चुकीच्या बाजूने जात होत्या आणि त्यावेळी त्या भागात धुक्‍याचे साम्राज्य होते त्यामुळे ही धडक झाली असे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार जलधाका भागात घडला. वऱ्हाडी मंडळी धूपगुरीकडे चालली होती. मृतांमध्ये चार लहान मुलांचाही समावेश असून अन्य दहा जण जखमी झाले आहेत. त्यांना जलपैगुडीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ( jalpaiguri accident )

या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्‍त केला असून त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या घटनेविषयी दु:ख व्यक्‍त करीत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी अडीच लाखांची मदत घोषित केली आहे. ( jalpaiguri accident )

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.