पार्थो दासगुप्ता यांचा जामीन फेटाळला

दासगुप्ता यांचा कोठडीतील मुक्काम वाढणार

मुंबई – टेलिव्हिजन रेटींग पॉईंट्‌स अर्थात टीआरपी वाढविण्यासाठी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे “बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा गुन्हे शाखेने मागच्या महिन्यात न्यायालयात केला होता.

याप्रकरणी बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा जामीन अर्ज मुंबईतील सत्र न्यायालयाने फेटाळला. यामुळे दासगुप्ता यांना आणखी काही काळ पोलिस कोठडीमध्ये रहावे लागणार आहे.

टीआरपी वाढविण्यात सर्वतोपरी सहकार्य करत असल्याबद्दल पार्थो यांना अर्णब हे लाखांची लाच देत होते. त्यातून दासगुप्ता यांनी मोठया प्रमाणात स्थावर मालमत्ता व दागिने विकत घेतल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

पुण्यातून अटक केल्यानंतर पार्थो दासगुप्ता (वय 55) यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच त्यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी गुन्हे शाखेने न्यायालयाकडे केली. त्यानुसार कोर्टाने त्यांची पोलीस कोठडी वाढवली होती. त्यावेळी गुन्हे शाखेने गोस्वामी-दासगुप्ता यांच्यात घडलेल्या आर्थिक व्यवहाराबाबतही माहिती दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.