श्रीनगर – त्राल आणि संगम भागात हातबॉम्ब फेकण्याच्या घटनेत सहभागी असणाऱ्या जैश ए महंमद शी संबंधित दहशतवादी मोड्युल लष्कर आणि पोलिस आणि निमलष्करी दलाच्या सहकार्याने उद्ध्वस्त करण्यात आले.
या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली. ते सर्व जण पाकिस्तानातील त्यांच्या हॅंडलरच्या संपर्कात होते. अलिकडच्या काळात त्यांच्या सुचनेवरून सुरक्ष दलांच्या तळांवर त्यांनी बॉम्ब फेकले होते. या दहशतवाद्यांकडून स्फोटकांच्या साठ्यासह दहशतवादी कृत्यांसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.
गेल्या महिन्यात आंवंतीपोरा येथून दोन जणांना अटक करण्यात आली होती. त्याच संबंध जैश ए महंमद या संघटनेशी होता. त्यांच्या तपासात या मॉड्यूलची माहिती मिळाली होती. हे दोघे दहशतवाद्यांना आसरा देत असत. त्यांना समाजातून पाठींबा मिळवून देण्याचा प्रयत्न करत असत.