बॅनर्जींच्या सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विचारांशी सहमत नाही – जयराम रमेश

नवी दिल्ली – नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जींच्या सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विचाराशी सहमत नसल्याचे मत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मंगळवारी व्यक्त केले. सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांमधील सरकारचा वाटा ५० टक्क्यांपेक्षा कमी करून त्यांच्या खासगीकरणावर भर द्यावा, असा विचार बॅनर्जी यांनी व्यक्त केला होता.

दरम्यान जयराम रमेश यांनी यासंदर्भात मत व्यक्त करताना ट्विट केले आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात की ‘मला अभिजित बॅनर्जी यांची बौद्धिक क्षमता आणि अर्थशास्त्रातील ज्ञानाविषयी आदर आहे. मात्र, सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याच्या त्यांच्या विचाराची मी पूर्णपणे असहमत आहे,’ असे ट्विट जयराम रमेश यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेल्या भेटीनंतर बॅनर्जींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते. सध्या देशांतील बँकांची स्थिती चिंताजनक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी – सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन) बडग्यामुळे बँका अतिसावध पवित्रा घेत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.