“अर्थ’च्या रीमेकमध्ये जॅकलीन?

बॉलीवूडमध्ये सध्या रिमेक चित्रपटांची चलती सुरू आहे. त्यातच आता 1982मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट “अर्थ’ चित्रपटाचा रिमेक साकारण्यात येत आहे. या चित्रपटात कुलभूषण खरबंदा, स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. महेश भट्‌ट यांच्या “अर्थ’ चित्रपटाचा रिमेक निर्माता शरत चंद्र हे साकारत आहे.
या चित्रपटाचा 1993मध्ये साकारण्यात आलेल्या तमिळ रिमेकमध्ये अभिनेत्री रेवतीने मुख्य भूमिका साकारली होती. मुळ चित्रपटात शबानाने कुलभूषण खरबंदाच्या पत्नीची, तर स्मिताने दुसरी महिला कविताची भूमिका साकारली होती. आताच्या रीमेकमध्ये स्मिता पाटीलची भूमिका जॅकलीन फर्नांडिस साकारणार असल्याचे समजते.

चित्रपटाशी संबंधी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे कास्टिंग सुरू होण्यापूर्वी रेवती ही स्क्रिप्टवर काम करत आहे. तसेच निर्मात्यांनी जॅकलीनशी संपर्क साधला होता. ही भूमिका आणि कॉन्सेप्ट जॅकलीनला खूपच आवडली आहे. या सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकचा हिस्सा बनण्यासाठी ती खूपच उत्साहित असून तिने भूमिका साकारण्यास सहमती दर्शविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.