शिल्पा शेट्टीला स्पेशल बर्थडे गिफ्ट

बॉलिवूडपासून ते टेलिव्हिजनच्या दुनियेत यशस्वीपणे कारर्किद घडविणारी सर्वाधिक फिट असलेल्या अभिनेत्रीपैकी एक असलेल्या शिल्पा शेट्टीने आज आपला 44वा वाढदिवस सेलिब्रेट केला. या खास क्षणी तिचा पती राज कुंद्राने आपल्या पत्नीला एक सुंदर असा संदेश आपल्या सोशल अकाउंटवर शेअर करत दिला स्पेशल गिफ्ट दिले आहे.

राजने शिल्पाला वाढदिवसाचा शुभेच्छा देत एक सुंदर असा फोटो पोस्ट केला आहे. ज्यात दोघेही सोबत दिसत आहे. या फोटोत राजने नेव्ही ब्ल्यू रंगाचा शर्ट आणि लाइट ब्राउन पॅट घातली आहे. तर शिल्पाने नेव्ही ब्ल्यू कलरच्या ड्रेसमध्ये खुपच ऍट्रॅक्‍टिव दिसत आहे. या सुंदर अशा फोटोला राजने एक प्रेमळ असा संदेश दिला आहे. या संदेशमध्ये आपल्या भावना व्यक्‍त करताना राज म्हणतो, “मी जेव्हा आपल्या जीवनात मागे वळूण बघतो तेव्हा देवाचे आभार मानू इच्छितो. कारण त्याने माझ्या जीवनात सर्वात सुंदर अशी अेंजल मला दिली. तु माझ्यासाठी एक वरदान आहे आणि मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे शब्दांत सांगू शकत नाही. तुला वाढदिवसाचा कोटी कोटी शुभेच्छा!!’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.