मुंबई – नायक,स्लम डॉग मिलेनियर,राम लखन असे अनेक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या अभिनेता अनिल कपूरचा आज वाढदिवस. आपल्या अभिनयासोबत लूक मेंटेन ठेवण्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे अनिल कपूरचे बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये देखील मोठे फॅनफॉलोविंग आहे. अनिल कपूर यांचा आज ६६ वा वाढदिवस. अमिताभ बच्चन,मिथुन जॅकी श्रॉफ यांच्यासह नव्या रणवीर सिंह,अक्षय कुमार अशा अनेक दिग्गजांसोबत अनिल कपूरने स्क्रिन शेअर केली. जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांनी सोबत काम केलेल्या एका सिनेमाचा एक किस्सा प्रचंड चांगलाच प्रचलित झाला आहे.
परिंदे या सुपरहिट सिनेमात अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांनी सोबत काम केले होते. दोघांनी सोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती त्यामुळे दोघांचे ट्युनिंग भन्नाट जमले होते. अशात एका सिन दरम्यान जॅकी श्रॉफ यांना अनिल कपूरला कानाखाली मारायची होती. जॅकी दादाने देखील अनिलला बरोबर कानाखाली मारली. दिग्दर्शकाने देखील ओके बोलले. परंतु अनिल कपूर यांना मात्र तो शॉट ओके वाटला नाही.
अनिल कपूर यांनी पुन्हा दिग्दर्शकाला तो शॉर्ट घेण्यास सांगितले. मग जॅकी दादाने पुन्हा एकदा अनिल कपूरच्या कानाखाली मारली दोन.. चार.. आठ .. दहा वेळा सेम शॉट घेण्यात आला. परंतु अनिल कपूर यांनी सर्वकाही परफेक्ट वाटत नव्हतं. तब्बल सतरा वेळा थप्पड खाल्ल्यानंतर अनिल कपूर यांनी शॉट ओके असल्याचे म्हंटले. परिंदे सिनेमाची जेव्हा जेव्हा आठवण काढली जाते तेव्हा तेव्हा अनिल कपूर यांचा हा किस्सा आठवल्याशिवाय राहत नाही.