नवी दिल्ली : जगभरात पुन्हा एकदा करोनाचे सावट पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना देखील आखल्या जात आहेत. दरम्यान, मागील 24 तासांत देशात 201 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशात आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 46 लाखांच्या पार गेली आहे.
देशात सध्या 3,397 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी नवीन आकडेवारी जारी केली आहे. जगभरात सध्या कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या BF.7 व्हेरिंटचे चार रुग्ण आढल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. काही राज्यांनी मास्कसक्ती लागू केली आहे. देशात शुक्रवारी देशात करोनाचे 163 नवीन रुग्ण आढळले होते तर, करोनामुळे गेल्या 24 तासात 6 जणांना आपला जीव गमवावा लागला असून, त्यानंतर एकूण मृतांचा आकडा आता 5 लाख 30 हजार 690 वर पोहोचला आहे.
India records 201 new COVID-19 infections in last 24 hours
Read @ANI Story | https://t.co/vySX0S2Ibc#COVID19 #COVID #Coronavirus pic.twitter.com/BYJLEA9aMX
— ANI Digital (@ani_digital) December 24, 2022
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. केरळमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. करोना महामारी सुरु झाल्यापासून आजपर्यंत भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 30 हजार 691 आहे. देशातील दैनंदिन रुग्ण सकारात्मकतेचे प्रमाण 0.15 टक्के आणि साप्ताहिक रुग्ण सकारात्मकता दर 0.14 टक्के आहे.