मुंबई – अभिनेता रितेश देशमुखचा वेड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र रितेशच्या या सिनेमातिला एका गाण्याने अख्या बॉलीवूडला वेड लावल्याचे पाहायला मिळत आहे. कॉलेज तरुणाईला भुरळ घालणारा वेड हा सिनेमा प्रेम आणि नात्यावर भाष्य करणारा आहे. रितेशसोबत या सिनेमात त्याची पत्नी जेनेलिया देखील दिसणार आहे.
View this post on Instagram
या सिनेमातील ‘वेड लावलय’ हे गाणं इतकं प्रसिद्ध झालं आहे की अनेकांकडून सोशल मीडियावर याच्या रिल्स केल्या जात आहेत. बॉलिवूड कलाकारांनी तर या गाण्याला अक्षरशः डोक्यावर घेतलय. सलमान खान आणि रितेशची जबरदस्त केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळते. म्हणूनच हे गाणं खूप पॉप्युलर होतंय.
View this post on Instagram
वेड सिनेमा स्वतः रितेशने दिग्दर्शित केलेला असल्यामुळे याच जोरदार प्रमोशन देखील सुरु आहे. म्हणुनच बॉलिवूडमधील अनेक कलाकार या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. अभिनेता विकी कौशलने देखील रितेशसोबत या गाण्याच्या ठेक्यावर ताल धरलेला पाहायला मिळतोय. त्यासोबतच ज्युनिअर बच्चन अर्थात अभिषेक बच्चन याला देखील रितेशने या गाण्यावर नाचवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. अभिनेत्री अनन्या पांडे,कारण जोहर, अनिल कपूर अशा अनेक बड्या दिग्गजानी वेड लावलयवर डान्स केला आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram