मुंबई – मुंबईतील प्रसिद्ध जे जे रुग्णालयात विविध पदावर काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी तकडाफडकी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ज्येष्ठ डॉक्टर डॉ. तात्याराव लहाने यांचा देखील समावेश आहे. डॉ. तात्याराव लहाने, रागिणी पारेख यांच्यासहित 9 जणांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व वरिष्ठ डॉक्टरांनी जे जे रुग्णालयाचे अधिष्ठातांवर गंभीर आरोप केले आहेत.
जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता आपल्याला वर्षभरापासून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार राजीनामे देणाऱ्या सर्व वरिष्ठ डॉक्टरांची आहे. विशेष म्हणजे राजीनामा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये तात्याराव लहाने यांचे नाव असल्याने हे प्रकरण गंभीर असण्याची शक्यता आहे.
जे जे रुग्णलयातील ज्येष्ठ डॉक्टरांनी एक प्रसिद्ध पत्रक जारी करत राजीनामा देण्यामागील कारण सांगितले आहे. राजीनामा देणाऱ्या लहाने आणि इतर 8 डॉक्टरांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून त्यात संपूर्ण घटनाक्रम लिहिला आहे.
सेवानिवृत्तीनंतरही काम करणाऱ्या तात्याराव लहाने यांचे वेतन अधिष्ठातांनी अदा केले नसून लहाने यांना शासकीय निवासस्थान रिक्त करायला सांगून 7 लाख रुपये दंड ठोठावला, असे पत्रकात म्हटले आहे. निवासी डॉक्टरांना आमच्याविरोधात भडकावले जात असून त्यांना जे जे च्या डिन सहभागी असल्याचे तात्याराव लहाने यांनी म्हटले आहे.