मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय नाट्याच्या शेवट झाल्यानंतर गुरुवारी (दि.२८) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे.
या सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची देखील कॅबिनेट मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी छगन भुजबळ यांनी देखील शिवतीर्थावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह मंत्रीपदाची शपथ घेतली.
दरम्यान, मंत्री पदी नियुक्ती झाल्या नंतर छगन भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले आहे. भुजबळ म्हणाले, “मी जगेन की नाही हे मला वाटत नव्हतं. पण मी सर्वांच्या आशीर्वादाने मंत्री झालो आहे. मला विश्वास बसत नाही. तसंच गेल्या काही दिवसात माझ्यासोबत जे झालं ते मी कधीच विसरलो आहे. पण मी कोणासोबतही सुडबुद्धीचं राजकारण करणार नाही”. असं यावेळी ते म्हणाले. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनी वरील मुलाखती मध्ये छगन भुजबळ बोलत होते.