रोम – फिनलंड आणि स्वीडन या देशांच्या नाटोतील प्रवेशाला इटलीने पाठिंबा दर्शवला आहे. दोन्ही देशांनी नाटोमध्ये लवकरात लवकर सामील होण्यासाठी अंतर्गत प्रक्रियेला गती देण्यास ते तयार आहेत, असे इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी म्हणाले.
नाटोच्या सदस्यत्वाची जलद मान्यता ही या टप्प्यावर फिनलंड आणि स्वीडनसाठी सर्वोत्तम सुरक्षा हमी असेल, असे द्राघी यांनी रोममध्ये पत्रकारांना सांगितले. आदल्याच दिवशी, फिनलंड आणि स्वीडनने नाटामध्ये सामील होण्यासाठी औपचारिकपणे अर्ज केला आहे. मात्र तुर्कीने या दोन्ही देशांना नाटोचे सदस्यत्व देण्यास विरोध दर्शवला आहे. मात्र नाटोमधील अन्य सर्व सदस्य देशांनी या दोन्ही देशांच्या सदस्यत्वाला पाठिंबा देण्याचे सूतोवाच केले आहे.