नगर – माध्यमिक शिक्षक सोसायटीची मे महिन्यात होऊ घातलेल्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी संचालकांनी पुरोगामी सहकार मंडळाचे नेते प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने विरोधी दोन संचालकाच्या आरेरावी व दादागिरीच्या विरोधात माध्यमिक सोसायटीसमोर आंदोलन केले.
लाभांशबरोबर कायम ठेवीवरील व्याज द्यावे अशी संस्थेची उपविधी असून त्याची पूर्वकल्पना विरोधकांना असताना सुद्धा तरीही सभासदांना एकत्र करून संस्थेसमोर संस्थेची कुठलीही पूर्व परवानगी व पूर्वकल्पना न देता संस्थेच्या आवारात आंदोलन करणे, संस्थेच्या कारभाराबाबत सहकार मंत्र्यांपर्यंत तक्रारी करून संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव विरोधक आणतात.
यामुळे सभासदांमध्ये उलट सुलट चर्चा आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक ठुबे, उपाध्यक्ष धोंडीबा राक्षे, प्रा. भाऊसाहेब कचरे, सुरेश मिसाळ, सूर्यकांत डावखर, संजय कोळसे, बाळासाहेब सोनवणे, आण्णासाहेब ढगे आदी उपस्थित होते.