कॉंग्रेसमध्ये राहुल गांधींना पर्याय मिळणे अवघड- खुर्शिद

हैदराबाद -कॉंग्रेसमध्ये राहुल गांधी यांना अध्यक्षपदासाठी पर्याय मिळणे अवघड आहे. राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणे कॉंग्रेसला परवडणारेही नाही, अशी स्पष्टोक्ती पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांनी सोमवारी केली.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला सलग दुसऱ्यांदा नामुष्कीजनक पीछेहाट स्वीकारावी लागली. त्या पीछेहाटीची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, राहुल यांनी अध्यक्षपद सोडू नये, असा आग्रही सूर कॉंग्रेसमध्ये उमटत आहे. यापार्श्‍वभूमीवर, येथे पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना खुर्शिद यांनी भूमिका मांडली.

राहुल यांनी अध्यक्षपदावर कायम राहणे हा कॉंग्रेसपुढील एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी यावेळी सूचित केले. राहुल यांनी पदावर कायम रहावे या कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या इच्छेचा ते मान राखतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. नेहरू-गांधी परिवार कॉंग्रेसला बांधून ठेवणारी शक्ती आहे.

पक्षासाठी सर्वांधिक मते खेचून आणण्याची क्षमता त्या कुटूंबामध्येच आहे, अशी भूमिका खुर्शिद यांनी काही दिवसांपूर्वी मांडली होती. राजीनामा देण्याच्या निर्णयावर राहुल ठाम असल्याच्या पार्श्‍वभूमीवर खुर्शिद यांच्या भूमिकेला महत्व आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.