मेहुल चोक्‍सीच्या याचिकेवर आज फैसला

पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरण: उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

मुंबई- पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्या प्रकरणातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्‍सी याने परदेशात राहून ईडीने सुरू केलेल्या कारवाई विरोधात दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. या याचिकेला ईडीने जारेदार विरोध केल्याने याचिकेची तातडीने उद्या, मंगळवारी सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले.

भारतातून पळ काढलेल्या चोक्‍सी विरोधात ईडीने फास आवळण्यास सुरूवात केली. त्याच्या विरोधात आर्थिक गुन्हेगार कायदा 2018 नुसार फरार आरोपी म्हणून घोषीत करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्याच्या विरोधात पीएमएल कायद्यानुसार गुन्हा नोंदवून त्याला आर्थिक फरार गुन्हेगार घोषीत करावे, अशी विनंती करणारा अर्ज ईडीने मुंबईच्या विशेष कोर्टात केला आहे. त्या विरोधात चोक्‍सीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती इंद्रजित महंती आणि न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी चोक्‍सीच्या वतीने ईडीच्या कारवाईलाच आक्षेप घेतला. या प्रकरणातील साथीदारांच्या जबाबावर फरार घोषीत करण्याची कारवाई ही बेकायदा आहे. या साक्षीदारांची उलटतपासणी घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंतीही याचिकेत करताना चोक्‍सीने प्रकृती अस्वस्थ्याचे कारण देत तूर्तास भारतात परतण्यास असमर्थता दर्शविली आहे.

याला ईडीने जोरदार विरोध केला. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी विरोधात वॉरंट बजावलेले आहे. देशात येऊनही तपास यंत्रणेसमोर हजर होत नसल्याने तो गुन्हेगार आहे, हे सिद्ध करण्यास आणखीन नवा पुराव्याची आवश्‍यक्ता नाही. त्याच्या विरोधात नव्याने पुरावा सादर करण्याची गरज नाही, असा दावा करणारे प्रतिज्ञापत्रच ईडीने न्यायालयात सादर केले. याची दखल घेऊन न्यायालयाने या याचिकेवर उद्या तातडीने सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.