IT Cup Cricket Championship 2024 – अंकुर जोगळेकर मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने व आयडीयाज-अ-सास कंपनी यांच्या सहकार्याने आयोजित 18 व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत संदीप शांघाय (34 धावा व 4-12) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर इन्फोसिस संघाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाचा 54 धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले.
वाघोली येथील स्पोर्ट्सएज क्रिकेट अकादमी मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना इन्फोसिस संघाने 20 षटकात 7 बाद 135 धावा केल्या. यात संदीप शांघाय 34, हर्षद तिडके 32, पिराजी रनपूर 22, निखिल रोकडे 20 यांनी धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला.
याच्या उत्तरात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाचा डाव 18 षटकात सर्वबाद 81 धावात संपुष्टात आला. यात आदित्य लहाने 31, सुनील बाबर नाबाद 20 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. इन्फोसिसकडून संदीप शांघाय (4-12), हर्षद तिडके (3-16), सागर बिरदवडे (2-27) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 54 धावांनी विजय मिळवून दिला.
IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का, ‘या’ स्टार फलंदाजाच्या फिटनेसबाबत समोर आली मोठी अपडेट..
स्पर्धेचे पारितोषिक वितरण अंकुर जोगळेकरचे वडील विंग कमांडर उदय जोगळेकर, विजय जोगळेकर, अंजली जोगळेकर आणि पीडीसीएचे माजी उपाध्यक्ष मकरंद भिडे यांच्या हस्ते करण्यात आले.