इस्रो पुन्हा एकदा अंतराळात सोडणार देशाची छाप

अंतराळात स्पेश स्टेशन उभारणार-डॉ. के. सिवन

नवी दिल्ली : इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेनंतर आता इस्रोने पुन्हा एकदा अंतराळ संशोधनात देशाची प्रतिमा आणखी एकदा उंचावण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा मोठी मोहीम इस्रो हाती घेणार आहे. काही महिन्यांपूर्वीच इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी अंतराळात भारत आपले स्पेश स्टेशन उभारणार असल्याचे म्हटले होते. स्पेश स्टेशन उभारण्यापूर्वी अवकाशयान किंवा उपग्रहांना एकत्रित जोडण्याचे महत्त्वाचे काम इस्रोला पूर्ण करावे लागणार आहे. ही मोहीम अत्यंत गुंतागुंतीची आणि कठिण असल्याचे म्हटले जात आहे.

इमारत उभारण्यासाठी ज्या प्रकारणे विटांची रचना करावी लागते, तशाच प्रकारचे हे अभियान आहे. स्पेडेक्‍स म्हणजेच स्पेस डॉकिंग एक्‍सपेरिमेंट असे या मोहिमेचे नाव आहे, अशी माहिती डॉ. सिवन यांनी दिली. सध्या सरकारकडून या मोहिमेसाठी 10 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या मोहिमेसाठी पीएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमातून दोन उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत. अवकाशात सोडल्यानंतर या उपग्रहांची गती कमी करून त्यांना एकमेकांशी जोडलं जाणार आहे. जर त्यांची गती योग्यरित्या कमी झाली नाही तर ते उपग्रह एकमेकांवर आदळूदेखील शकतात आणि हाच या मोहिमेतील सर्वात कठिण भाग असल्याचेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.