इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार

इस्त्रायलची निवडणूक जिंकण्यासाठी नेतान्याहू मोदींकडून घेणार सल्ला

नवी दिल्ली : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू 9 सप्टेंबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेतान्याहून दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत. 17 सप्टेंबर रोजी इस्त्रायलमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेतान्याहू यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. मोदी यांची भेट नेतान्याहू यांच्या फायद्याची ठरु शकते असं मानलं जात आहे. प्राचाराचा भाग म्हणूनच ही भेट होत असल्याची टिका नेतान्याहू यांचे विरोधक करत आहे.

नेतान्याहू यांची ही भारत भेट अवघ्या काही तासांची असेल. ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. या भेटीत कोणतीही महत्वाची बैठक दोन्ही देशांमध्ये होणार नसून भविष्यातील व्यापारसंबंधी बैठकींसंदर्भात या बैठकीत एखादा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती सुत्रांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे. इस्त्रायलमधील निवडणुकांआधी प्रचाराचा भाग म्हणून नेतान्याहू मोदींना भेटणार असल्याचा अंदाज काही राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.