इस्रायलने घेतला मोकळा श्वास! ठरला जगातील पहिला कोरोनामुक्त देश

तेल अवीव : एकीकडे सगळे जग कोरोनारूपी संकटाचा सामना करत आहे. तर दुसरीकडे आता या संकटात जगासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तब्बल एक वर्षभरानंतर इस्रायलने देशभरात लागू असणाऱ्या मास्क वापरातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. देशातील जवळपास 80 टक्के जनतेला लस देण्यात यश मिळवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी या निर्णयाची घोषणा करण्यात आली. त्यामुळं कोरोनावर मात करणाऱ्या इस्रायलच्या या लढ्याकडे सारं जग एक आदर्श म्हणून पाहत आहे.

इस्रायलचे आरोग्यमंत्री यूली इडेलस्‍टेइन यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीकरणानंतर या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. त्यामुळेच निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली असली तरीही इथे कार्यालयांमध्ये मात्र कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार जवळपास 93 लाखांची लोकसंख्या असणाऱ्या या देशाने आतापर्यंत 50 लाखआंहून अधिक जनतेला कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली आहे. इस्रायलमधील टळणारं हे संकट पाहता इथं शाळाही सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. तर, येत्या काळात इथं पर्यटनासही नव्याने सुरुवात करण्यात येणार आहे.

लसीकरणामुळे इस्रायलमधील परिस्थिती झपाट्याने बदलली. रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णाचा आकडा कमी होण्यासोबतच मृतांचा आकडाही लक्षणीयरित्या घटला. जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत या देशात दिवसाला 10 हजार कोरोनाबाधित आढळत होते. आता हेच प्रमाण 100 आणि 200 वर पोहोचलं आहे.

मुख्य म्हणजे मोठ्या प्रमाणात नियमांमध्ये शिथिलता आणलेली असतानाही इथे कोरोनाचा संसर्ग कमालीचा नियंत्रणात आहे. त्यामुळे कोरोनाशी दोन हात करण्याचे इस्रायलचे तंत्र आणि रणनीती नक्कीच अनुकरणीय आहे. इस्रायलमध्ये नागरिकांंपर्यंत लस पोहोचवण्याची मोहिम मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली, आता त्याच धर्तीवर जगातील इतर राष्ट्रांत हा लढा जिंकला जातो का हे पाहणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.