Naor Gilon On Team India Victory: भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन यांनी शनिवारी (१४ ऑक्टोबर) पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानी संघावर टीका केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत ते म्हणाले की, पराभवानंतर पाकिस्तान आपला विजय हमासला समर्पित करू शकला नाही.
ते म्हणाले, “क्रिकेट विश्वचषक 23 मध्ये खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने विजय मिळवला याचा आम्हाला आनंद आहे आणि पाकिस्तान आपला विजय हमासच्या दहशतवाद्यांना समर्पित करू शकला नाही. सामन्यादरम्यान आमच्या भारतीय मित्रांनी पोस्टर दाखवून इस्रायलशी आपली एकजूट दाखवली. यामुळे आपण खूप भावूक झालो आहोत.
त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पीएम मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या फोटो असलेले पोस्टर धरलेले दिसत आहे. दहशतवादाविरोधात सुरू असलेल्या युद्धात भारत इस्रायलच्या पाठीशी उभा असल्याचे पोस्टरवर लिहिले आहे.
हमें खुशी है कि #CWC23 में #INDvPAK मैच में #भारत 🇮🇳 विजयी हुआ और पाकिस्तान अपनी जीत हमास के आतंकवादियों को समर्पित नहीं कर पाया।
हम हमारे भारतीय मित्रों द्वारा मैच के दौरान पोस्टर दिखाकर कर इज़राइल 🇮🇱 के साथ अपनी एकजुटता दिखाने से हम बेहद भाव विभोर हैं। 🙏
We are happy that… pic.twitter.com/fIDY4Ap7aJ
— Naor Gilon (@NaorGilon) October 14, 2023
भारताने पाकिस्तानचा पराभव केला –
गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकाच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताने त्यांचा 7 गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियाने पाकिस्तानचा 8व्यांदा विश्वचषकात पराभव केला.
दरम्यान, यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद रिझवानने श्रीलंकेविरुद्धचा पाकिस्तानचा विजय पॅलेस्टिनी नागरिकांना समर्पित केला होता.