-->

इसिसशी संबंधित प्रकरणात एनआयएचे तामिळनाडूमध्ये छापे

नवी दिल्ली : इस्लामिक स्टेटसशी संबंधित तपासात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) तामिळनाडूत अनेक ठिकाणी छापे घातले. तंजावर आणि तिरूचिरापल्ली येथील अनेक ठिकाणांवर हे छापे एनआयए न्यायलयाच्या वारंटनुसार घालण्यात आल्याचे सांगण्यात आले.

इसिसच्या हिंसने भरलेल्या विचारणीचा प्रसार केल्याबद्दल सहा जणांवर एनआयएने गुन्हा नोंदवला आहे. भारतात दहशतवादी गट स्थापन करण्यासाठी आणि इसिसमध्ये भरती करण्यासाठी हे सहा जण प्रयत्नशील होते. या गटाने तमिळनाडू आणि केरळमध्ये दहशतवादी कृत्ये करण्याचा कट रचला होता. श्रीलंका इसिसचा म्होरक्‍या झहरन हशीम आणि त्याच्या सहकाऱ्यांची विाचारणीचे हे सहा जण पाठीराखे होते.

यात अटक केलेल्या आरोपींच्या सहकाऱ्यांच्या दोन घरांची झडती घेण्यात आली. त्यात तंजावरचा अलावुद्दीन आणि तिरूचिरापल्लीचा एस सरफुद्दीन यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. त्यांच्याकडून दोन लॅपटॉप, सहा मोबाईल, अकरा सीम कार्ड, एक पेन ड्राईव्ह, एक हार्ड डिस्क, एक मेमरी कार्ड, पाच सीडी डिव्हिडी, एक कुऱ्हाड, या शिावय 17 कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली.

ज्प्त केलेली सामग्री एनआयएच्या न्यायलयात सादर करण्यात आली. त्यानंतर यातील डिजिटल उपकरणे न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवण्यात आली आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून इसिसच्या पुढील कारवायांबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.