तुमचे डोके ठिकाणावर आहे का? राष्ट्रवादीचा फडणवीस सरकारला सवाल

जमावबंदीच्या आदेशामुळे सरकारने गाठला असंवेदनशीलतेचा कळस!

मुंबई: पूरग्रस्त भागात फडणवीस सरकार १२ ते २४ ऑगस्ट दरम्यान जमावबंदीचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे अशा अवसंवेदनशील सरकारला, तुमचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

कोल्हापूर, सांगली भागात महापूरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कित्येक वर्षाने जमवलेला संसार एका क्षणात उघड्यावर पडला आहे. पशूधन देखील उद्धवस्त झाले असून शेतकरी, कष्टकरी यांना पुन्हा उभं कसं राहायचं, अशी चिंता सतावतेय. अशा परिस्थितीत सरकार जनसामान्यांना धीर देण्याऐवजी कलम १४४ लावून जमावबंदीचे आदेश लागू करत आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जनता सरकारवर रोष व्यक्त करते आहे, म्हणून कलम १४४ लावून सरकार कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका केली आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी असे अन्यायकारक फतवे सरकार काढत असेल, तर जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही…

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)