रैनावरील शस्त्रक्रियेनंतर ऱ्होड्‌सने केले हृदयस्पर्शी ट्‌विट

सुरेश रैना हा अनेक युवा खेळाडूंचा प्रेरणास्त्रोत

मुंबई – सुरैश रैनावर ऍम्सटरडॅमध्ये गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे तो या महिनाअखेर भारतात सुरू होणाऱ्या देशांतर्गत सामने खेळू शकणार नाही. रैनावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉंटी ऱ्होड्‌सने एक हृदयस्पर्शी ट्‌विट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ट्‌विटवर ऱ्होड्‌सने रैनाला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याने ट्‌विटमध्ये म्हटले की, सुरेश रैना तू आपल्या कामाच्या निष्ठेमुळे अनेक लोकांचा प्रेरणास्त्रोत आहेस. विशेषतः गेल्या काही वर्षांपासून. पण माझ्या मित्रा.. आता आपल्या शरीराचे ऐक. मी तुला जेवढ ओळखतो, त्यावर हे म्हणू शकतो की, तुला उद्यापासूनच प्रशिक्षणाला उतरण्याची घाई झाली असेल. थोड सबुरीने घे.

32 वर्षीय रैनाला गेल्या हंगामापासून गुडघ्याचा त्रास जाणवत होता. शस्त्रक्रियेतून सावरायला त्याला आणखी किमान 6 आठवडे लागण्याची शक्‍यता आहे. बीसीसीआयने ट्‌विट करत रैनाच्या शस्त्रक्रियेविषयी माहिती दिली. बीसीसीआयने आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले की, सुरेश रैनाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. काही महिन्यांपासून तो गुडघेदुखीने त्रस्त होता. त्याच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला किमान 4 ते 6 आठवडे लागू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)