सलमान खानच्या “टायगर 3’मध्ये इम्रान हाश्मी व्हिलन साकारणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. या रोलसाठी इम्रान हाश्मी काय काय तयारी करतो आहे, याची माहितीदेखील पुढे आली होती. सलमान खान आणि कतरिना कैफ यांनी रशियामध्ये या सिनेमाच्या पहिल्या शेड्युलच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
इम्रान हाश्मीने आतापर्यंत कधीही सलमान आणि कतरिनाबरोबर एकत्र काम केलेले नाही. या दोघांपैकी कोणीही इम्रान हाश्मी लीड व्हिलन साकारत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. निर्मात्यांनीही इम्रान हाश्मीच्या रोलबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. एवढेच नव्हे तर स्वतः इम्रान हाश्मीनेही आपण हा सिनेमा करत असल्याचे घोषित केलेले नाही, असे म्हटले आहे. मी सिनेमांमध्ये काम करतो. कारण लोकांना ते आवडते.
पण मी या सिनेमात आहे का नाही, हे मला माहीतच नाही. याबाबत मला प्रसिद्धी माध्यामांमधूनच माहिती मिळाली आहे. पण खरोखरच मला काहीच माहीत नाही, असे त्याने म्हटले आहे. त्यामुळे इम्रान हाश्मी नक्की “टायगर 3’मध्ये व्हिलन साकारणार आहे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.