वॉशिंग्टन – इराणी कमांडर कासेम सोलिमनी याच्या मृत्यूनंतर इराणने कोणतीही बदल्याची कृती केल्यास त्याला तातडीने चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. त्यासाठी इराणमधील 52 टार्गेट निश्चित करण्यात आली आहेत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प म्हणाले, हा एक इशारा समजा. जर इराणने कोणत्याही अमेरिकन नागरिकावर अथवा अमेरिकेच्या मालमत्तेवर हल्ला केला तर आम्ही 52 टार्गेट निश्चित केली आहेत. त्यातील काही उच्च दर्जाची आहेत. आणि ती इराण आणि इराणी संस्कृतीसाठी अत्यंत महत्वाची आहेत. इराणला अत्यंत कठोर आणि कडक प्रत्यूत्तर देण्यात येईल. अमेरिका यानंतर कोणताही इशारा देणार नाही, असेही आणखी एका टिवटमध्ये ट्रम्प यांनी म्हटले आहे.
सोलिमनीच्या मृत्यूनंतर अमेरिकन मालमत्तांवर हल्ले करण्याबाबत इराणच्या लष्कराचे उपप्रमूख अबु महदी अल-मुहांदीस फार धाडसी विधाने करत आहेत, असे ट्रम्प म्हणाले. सोलमनीच्या हत्येचे आदेश युध्द थांबवण्यासाठी दिले होते, युध्द सुरू करण्यासाठी नव्हे, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हत्येचे आदेश देताना म्हटले होते. ट्रम्प यांच्या आदेशानेच परदेशातील अमेरिकन नागरिकांच्या हत्या करणाऱ्या सोलमनीच्या हत्येसाठी आक्रमक मोहीम राबविली होती, असे म्हटले आहे.