Ira-Nupur Wedding Reception : अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान आणि जावई नुपूर यांचे मुंबईत 3 जानेवारीला कोर्ट मॅरेज झाले होते. त्यानंतर आयरा आणि नुपूरने उदयपूरमध्ये कुटुंब आणि मित्रमंडळींच्या उपस्थित मोठ्या उत्साहात ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. लग्नानंतर आयरा आणि नुपूरचं मुंबईत 13 जानेवारीला वेडिंग रिसेप्शन पार पडले. या पार्टीला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
विशेष म्हणजे मराठमोळा अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी देखील आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीत हजेरी लावली होती. आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये आर्ची-परश्याला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वेडिंग रिसेप्शन पार्टीतील त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आकाश आणि रिंकू फोटोसाठी पापाराझींना पोझ देताना दिसत आहेत.
यानिमित्ताने पुन्हा एकदा रिंकू आणि आकाशला एकत्र पाहून चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. आयराच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीसाठी रिंकूने मराठमोळ्या लूकमध्ये दिसून आली. निळ्या रंगाची साडी नेसून रिंकूने सिंपल लूक केला होता. तर आकाशने काळ्या रंगाचा सूट घातला होता.
View this post on Instagram
आयरा आणि नुपूरच्या या रिसेप्शन पार्टीत आकाश आणि रिंकूने हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या पार्टीत उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी, सलमान खान, शाहरुख खान, रेखा, हेमा मालिनी यासारख्या अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहिले होते.