मुंबई – आयपीएल (IPL 2022) मध्ये आज 24 वा सामना खेळला जात आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक (टाॅस) जिंकून गुजरातविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
#RR have won the toss and they will bowl first against #GujaratTitans
Live – https://t.co/yM9yMibDVf #RRvGT #TATAIPL pic.twitter.com/TE0Udrg0ZO
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2022
गुजरात टायटन्सने आजच्या सामन्यात दोन बदल केले आहेत. दर्शन नळकांडे यांच्या जागी यश दयाल तर साई सुदर्शन यांच्या जागी विजय शंकर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट दुखापतीमुळे आजच्या सामन्यातून बाहेर आहे. त्याच्या जागी जिमी नीशमचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (c&wk), रासी व्हॅन डर ड्युसेन, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेम्स नीशम, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन, प्रणभव कृष्णा
गुजरात टायटन्स : शुभमन गिल, मॅथ्यू वेड (wk), विजय शंकर, हार्दिक पंड्या (c), डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, यश दयाल, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन
दरम्यान, या मोसमात गुजरात आणि राजस्थान हे दोन्ही संघ बलाढ्य मानले जात आहेत. दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली असून गुणतालिकेत राजस्थान अव्वल तर गुजरातचा संघ पाचव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांचे समान गुण असले तरी राजस्थानचा रन रेट हा गुजरातपेक्षा अधिक आहे.