मुंबई – मुंबई विमानतळावर एनसीबीकडून आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्ज तस्करांविरोधात एनसीबीने कारवाई केली आहे. यामध्ये 3 किलो 980 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या ड्रग्जची किंमत सुमारे 24 कोटी रुपये आहे. या प्रकरणी एका दक्षिण आफ्रिकन नागरिकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई विमानतळावर ड्रग्जची तस्करी करण्यात येणार असल्याची खबर एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानुसार एनसीबीने विमानतळावर सापळा रचला. या कारवाईत बॅगमध्ये ड्रग्जचे चार पाकिटं आढळून आली आहेत. जवळपास 3 किलो 980 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, मागील 13 मार्चला देखील दहीसर पोलिसांनी देखील ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी कारवाई केली होती. यावेळी 6 किलो 560 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. तसेच या ड्रग्जची किंमत 1 कोटी 95 लाख रूपये इतकी होती. त्यावेळी उत्तर प्रदेशातील एका व्यक्तिला ताब्यात घेण्यात आले होते.