दुबई – आयपीएल स्पर्धेसाठी येथे दाखल झालेल्या चेन्नई संघातील एका गोलंदाजासह सपोर्ट स्टाफमधील बारा जणांना करोनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी समोर आले होते, आता त्यात महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड यालाही बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने चेन्नई संघाच्या चिंतेत भर पडली आहे.
त्याचवेळी प्रमुख खेळाडू सुरेश रैना याने यंदाच्या स्पर्धेतून वैयक्तिक कारणाने माघार घेत असल्याचे जाहीर केले. हा निर्णय अत्यंत आश्चर्यकारक समजला जात आहे. करोनाची बाधा होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठीच त्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात असून त्याबाबत आयपीएल समितीने काहीही माहिती दिलेली नाही.